शाळेचा इतिहास वा वाटचाल
संत तेरेजा चर्च हरेगाव या चर्चचे धार्मिक कार्य करण्या साठी सर्व यूरोपियन धर्मगुरू कार्यरत होते. चर्च परिसरातील जनतेची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे साहाजिकच त्यांना शिक्षणा विषयी आस्था नव्हती त्या वेळच्या यूरोपियन धर्मगुरुनी ठरविले की जर या ग्रामीण भागातील जनतेची प्रगति करायची असेल तर त्यांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही आणि म्हणून त्यावेळचे धर्मगुरू फादर बादर यांनी ही गरज लक्षात घेऊन सन 1922 मध्ये संत तेरेजा या नावाने प्राथमिक शाळा सुरू केली या शिक्षणाच्या योजनेला साथ म्हणून ऑस्ट्रिया मधील दानशूर व्यक्ति कुमारी उरसूला ग्रोल यांनी फादर सिक्थ यांच्या प्रेरणेने भव्य अशी इमारत बांधण्यासाठी साडे सहा लाख रुपयांची देणगी दिली .व त्या देनगीतून शाळेची भव्य अशी वास्तु उभारण्यात आली
सन 1922 ला सुरू झालेली प्राथमिक शाळा त्यावेळी विध्यार्थी संख्या अतिशय कमी होती इवलेसे रोप लवियले दारी त्याचा वेलू गेला गगणावरी या उक्ती प्रमाणे त्या छोटयाशा रोपचा वटवृक्ष झालेला आहे . आज या ठिकाणी हजारो विध्यार्थी शिक्षण घेत आहे .
हरेगाव धर्मग्रामाच्या प्रत्येक खेड्यात शाळेची सोय नव्हती तेथील मुलांना देखील शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी स्थानिक धर्मगुरुनी मुलांसाठी बोर्डिंगची व्यवस्था केली या बोर्डिंग मध्ये राहून हजारो विध्यार्थी शिक्षण घेऊन आज ते उच्च पदावर कार्यरत आहे .
चर्चच्या सहकार्याने रे.फा.जॉर्ज डिसूझा यांनी लहान बालकांसाठी संत तेरेजा बालवाडी या नावाने बालवाडी सुरू केली . व ती चालवण्यासाठी प्रशिक्षित सेविकेची निवड केली
विध्यार्थी सर्वांगीण विकासासाठी शाळेमार्फत विविध प्रकारची मंडळे चालवली जातात त्या मध्ये सांस्कृतिक मंडळ ,परीक्षा मंडळ ,सहल मंडळ ,सण उत्सव मंडळ ,जयंती पुण्य तिथी मंडळ, कब- बुलबुल या मंडळा मार्फत विविध उपक्रम राबवून विध्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधला जातो व या सर्व उपक्रमात पालकांचा सहभाग असतो . शाळेवर देखरेख ठेवण्यासाठी धर्मगुरू स्वता त्या मध्ये सहभाग घेऊन व्यवस्थापक म्हणून कार्य करतात .